News portals- सबकी खबर (दिल्ली )
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जपानचे पंतप्रधान शिंझो ॲबे यांची भेट घेतली. बँकॉकमधल्या पूर्व आशिया शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली. पुढील महिन्यात होणाऱ्या भारत-जपान वार्षिक परिषदेसाठी पंतप्रधान ॲबे यांचे स्वागत करण्याकरता उत्सुक असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले | आगामी वार्षिक परिषदेच्या यशाामुळे भारत-जपान दरम्यानची विशेष सामरिक आणि जागतिक भागीदारी अधिक विकसित व्हायला मदत होईल असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले
दोन्ही देशादरम्यानच्या वाढत्या आर्थिक सहकार्याचे उभय नेत्यांनी स्वागत केले. मुंबई-अहमदाबाद दरम्यानच्या अति जलद रेल्वे प्रकल्पाच्या प्रगतीचा दोन्ही नेत्यांनी आढावा घेतला.या वर्षी होणारी भारत-जपान वार्षिक परिषद आणि भारत-जपान द्विपक्षीय चर्चा यांचे दोन्ही नेत्यांनी स्वागत केले.नियमावर आधारित तसेच खुलं आणि सर्वसमावेशक भारत-पॅसिफिक क्षेत्र विकसित करण्याप्रती दोन्ही पंतप्रधानांनी आपली कटिबद्धता पुन्हा व्यक्त केली|
Recent Comments